Big Achievement of Jalgaon Crime Branch : Attal thieves with stolen bikes in the net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या बांधल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश उर्फ घनशा शीलदार बारेला (24, कर्जाना, ता.चोपडा) व लखन उर्फ टारझन सुरेश बारेला (22, रा.अजगिर्या, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गणेश बारेला आणि लखन बारेला हे दोघे चोरीच्या मोटारसायकली चोपडा शहर व परीसरात वापरत असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर हवालदार सुरज मधुकर पाटील, परेश प्रकाश महाजन, रवींद्र रमेश पाटील, राहुल मधुकर बैसाणे, दीपककुमार फुलचंद शिंदे, प्रमोद शिवाजी ठाकूर आदींनी चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावात सापळा रचून दोघांना अटक केली.
तीन गुन्ह्यांची कबुली
चोपडा शहर व नाशिकच्या सातपुर परीसरातून चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली दिली असून चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपासकामी दोघांना चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.