जळगाव ग्रामीणच्या बालेकिल्यात शिवसेनेत फूट

0

मंत्री गुलाबराव पाटलांनीच खान्देशातील शिवसेना पक्ष संपविला ; माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांचा गौप्यस्फोट

जळगाव – जिल्हयासह राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राज्यात शिवसेना भाजप युती जाहीर झाली असून उमेदवारही जाहीर झाले आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांमध्ये मतदानापूर्वीच फूट पडली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी संपूर्ण खान्देशात शिवसेना संपविण्याचे कार्य केले आहे. प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये त्यांनी भांडणे लावली असून प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचे दोन गट निर्माण केले आहे. निवडणुकीत पक्षाने उमेदवार बदलावा , उमेदवार न बदलल्यास त्याच्याविरोधात अपक्ष उमेदवाराला पाठींबा देवून विजयी करु, असा गौप्यस्फोट करुन शिवसेनेचे माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

विष पेरुन एकाच ठिकाणी दोन गट बनिवले
जिल्ह्यात शिवसेना वाढावी म्हणून ज्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले असे गुलाबराव पाटील यांनी उलट काम केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह मध्ये फुट पाडली. पाचोरा, पारोळा, चोपडा येथील उदाहरणे जानकीराम पाटील यांनी दिली. तसेच चिमणराव पाटील व मच्छिंद्र पाटलांमध्ये विष पेरले. यावेळी चिमणराव पाटील हे हरले होते. त्यामागेही मंत्री पाटील हे होते, असेही ते म्हणाले. अशाप्रकारे प्रत्येक गावात दोन वेगवेगळे गट तयार झाले असून त्यामुळे जिल्ह्यासह खान्देशातील शिवसैनिकांमध्ये मंत्री पाटील यांच्याविषयी नाराजी असल्याचेही ते म्हणाले.

पैसे देवून मते मिळत असल्याची हवा
निवडणुकीत पैसे देवून मते मिळत असल्याची हवा, मंत्री पाटील यांच्यासह रावसाहेब पाटील यांच्या डोक्यात शिरली आहे. पतपेढ्यांमध्ये अनेकांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यांना ते मिळवून देण्यासाठी मंत्री पाटील यांना तोफान घातले. मात्र आजही किती जणांना त्यांनी पैसे मिळवून ते सांगावे, उलट पैसे न मिळाल्याने अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या, मुलींनी आत्महत्या केल्या मात्र पैसे मिळाले नाही. जे पक्षामध्ये निष्ठावान आहेत त्यांना डावलण्याचे कामही केले. प्रत्येक ठिकाणी पदाधिकार्‍यांमध्ये भांडणे लावण्याचेही कामही मंत्री पाटील यांनी केले असल्याचेही ते म्हणाले.

गुलाबराव पाटलांनी प्रत्येक कामात कमिशन खाल्ले!
शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे बुधवारी सायंकाळी जानकीराम पाटील यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलतांना ते म्हणाले की,सहकार राज्यमंत्री असताना देखील त्यांनी पतसंस्थाना न्याय दिला नाही. अनेक शेतकरी, उपवधू मुलींच्या बापांना आत्महत्या करावी लागली. शेतकर्‍यांना आत्महत्या केल्यानंतर 1 लाख नव्हे 30 च हजार मिळतात. कुणीही निविदा भरल्यास गुलाबराव त्यांना दम देतात. धरणगावचे लोक आज जामनेरला जावून काम करताय जळगाव ग्रामीणमध्ये त्यांना कामे दिली जात नाही. गुलाबरावांना या निवडणुकीत धडा शिकवला जाणार असून आम्ही आजपासून त्यांचा प्रचार करणार नाही. मी त्यांच्या भावासारखा आहे परंतु निवडणूकपूर्वी आमचा निर्णय ठाम आहे. मी आज कुणाचाही दबलेला नसल्याचे जानकीराम पाटील यांनी सांगितले.

…तर गुलाबरावांच्या विरोधात अपक्षाला असणार पाठींबा
गुलाबराव पाटलांच्या त्रासामुळे अनेक जण घरीच बसून असून कोणीही त्याच्या प्रचारासाठी बाहेर निघणार नाही. मंत्री पाटील यांना त्यांनाचा मुलगा घरी घेवून जाणार आहे. मंत्री पाटील यांना माझ्या साळवा साखरी गटात होणारे 22 ते 23 हजाराचे मतदानापैकी एकाचेही मतदान होणार नाही. निवडणूकच नाहीतर शेवटपर्यंत आपण शिवसेनेतच राहणार आहोत. मात्र मंत्री पाटील यांचा प्रचार करणार नाही, याउलट अपक्ष उमेदवाराला पाठींबा देवून त्याला विजयी करु असेही ते म्हणाले.