जळगाव ग्रामीणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यांसह खाजगी पंटर जाळ्यात

0
वीज कनेक्शनसाठी स्वीकारली तीन हजारांची लाच
जळगाव :- नवीन वीज कनेक्शनसाठी तीन हजारांची लाच घेताना जळगाव ग्रामीणचा कनिष्ठ अभियंता कुणाल ज्ञानेश्‍वर महाजन (28) व खाजगी पंटर परेश उर्फ पप्पू सुधाकर नेवे (भोईटे नगर, जळगाव) यांना जळगाव एसीबीने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपी महाजनने लाचेची मागणी करून ती रक्कम खाजगी पंटर नेवेकडे दिल्यानंतर पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बेटावदमधील लाचखोर सहाय्यक अभियंता जाळ्यात
नवीन वीज मीटर घेण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बेटावद (ता.शिंदखेडा) येथील वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई  बुधवारी सायंकाळी करण्यात आली. पडावद येथील 57 वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. दरम्यान, बेटावदसह जळगावात वीज कंपनीतील अधिकार्‍यांवर झालेल्या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली.