धरणगाव: राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर आणि भाजपचे जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज दोघांनीही आज शेवटच्या दिवशी अर्ज माघे घेतले आहे. माघारीनंतर दोघेही कोणाला पाठींबा देतात याकडे लक्ष लागले आहे. माधुरी अत्तरदे यांनी माघार घेतली असली तरी अद्याप मात्र त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांचा अपक्ष अर्ज कायम आहे. लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांनी माघार घेतलेले नाही.
जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेने राज्गुयमंत्लारी बराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने धरणगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांना उमेदवारी दिली आहे. परंतू माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी राष्ट्रवादीसह अपक्ष अर्ज दाखल होता. दरम्यान, गुलाबराव देवकर आजच कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे. आता देवकर कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे भाजपच्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांनी देखील माघार घेतली आहे.