जळगाव ग्रामीणमध्ये विकासकामांसाठी कटीबध्द – ना. पाटील

0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते तालुक्यातील आव्हाणे येथे मूलभूत सुविधा अंतर्गत मंजूर रस्त्याचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.

आव्हाणे येथे सहकार राज्यमंत्री पाटील यांनी मूलभूत सुविधेंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. आमदार निधीतूनही विविध विकास कामे मंजूर केले आहेत. याचेच भूमिपूजन ना. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतातून ना. पाटील म्हणाले की, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यांचा विकास महत्त्वाचा असतो. रस्त्यांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मतदारसंघातील उर्वरित विविध विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चव्हाण, पिंटू पाटील, सरपंच वत्सलाबाई मोरे, उपसरपंच हिराबाई ढोले, ग्रामपंचायत सदस्य दीपक चौधरी, भगवान पाटील, राकेश चौधरी, दगडू सुरवाडे, उमेश चौधरी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.