जळगाव । मागील वर्षी बोडअळीच्या प्रादुर्भावामुळे जळगाव व धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले होते. सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने पंचनामे करून जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील बाधित झालेल्या 59231 शेतकर्यांचा 58 कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाकडून 15.50 कोटींचा पहिला हप्त्याचे 15.50 कोटींचे अनुदान तहसील कार्यालयामार्फत शेतकर्यांना वितरित करण्यात आलेले आहे. उर्वरित रक्कम शेतकर्यांना मिळण्यासाठी 10 दिवसांपूर्वी संबंधित अधिकार्यांना सूचना ना.गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आहेत. जिल्ह्यात गेल्यावर्षी कापसावर व धान पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याची दखल घेत सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांना नुकसान भरपाई बाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशिते केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
जळगाव तालुक्याची नुकसानभरपाई स्थिती
गत वर्षी जळगाव तालुक्यात 16235 शेतकर्यांनी 34290 हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी केली होती.मात्र अवेळी पाऊस व बोन्ड अळीचा प्रदूर्भावणे शेतकरी हवालदिल झाला होता.त्यामुळे 11000 जिरायत व 19861 बागायत असे एकूण 308621 हेक्टर क्षेत्र बाधित होऊन 14713 शेतकर्यांचे नुकसान झाले होते.ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने 14713 बाधित शेतकर्यांना 31 कोटी 61 लक्ष 77 हजार रकमेचा नुकसान भरपाई प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 8 कोटी 43 लक्ष 13 हजार अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर पहिला हप्त्याचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
धरणगाव तालुका नुकसानभरपाई स्थिती
धरणगाव तालुक्यात 44528 शेतकर्यांनी 26717 हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी केली होती.यापैकी 14935 हेक्टर जिरायत व 6278 हेक्टर बागायत असे एकूण 21213 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले होते.यासाठी शासनाकडून 26 कोटी 41 लक्ष 90 हजार रकमेचा प्रस्ताव मंजूर असून त्यांपैकी 7 कोटी 4 लक्ष 50 हजार अनुदान शेतकर्यांना तहसील प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहे. जळगाव व धरणगाव तालुक्यातील बाधित शेतकर्यांना उर्वरित रक्कम लवकरच मिळेल अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.