जळगाव ग्रामीण मतदार संघात ना. गुलाबराव पाटील यांचा दबदबा कायम

0

धरणगाव । जिल्हा परिषदेच्या तीन गटात 11 उमेदवार तर पंचायत समितीच्या 6 गणातून 27 उमेदवार रिंगणात उभे होते. निवडणूकीत गटात व गणात तिरंगी लढत होती. गटातून शिवसेनेला 2 तर भाजपाला 1 जागेवर विजय मिळवता आला आणि 6 गणातून शिवसेना 5 तर भाजपा 1 जागेवर विजयी झाले असून शिवसेनेला प.स. ला स्पष्ट बहुमत मिळाले असून पुन्हा आपल्याकडे सत्ता काबिज करण्यात यशस्वी झाले. जळगांव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेने आपला दबदबा पुन्हा सिध्द केला. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे सफाया केले असून खातेही उघडता आले नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली असून पाळधी-बांभोरी गटात आपला सुपुत्र प्रतापराव गुलाबराव पाटील याचा दणदणीत विजय प्राप्त करून आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले आहे.

जिल्हा परीषद गटातून विजयी उमेदवार याप्रमाणे
माजी जि.प उपाध्यक्ष व विद्यमान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. आबा पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. वैशाली पी. पाटील सोनवद-पिंप्री गटातून झाला पराभव. * साळवा-बांभोरी बु. गटातून माधुरी चंद्रशेखर अत्तरदे (10625) भाजपा हे विजयी झाले तर उषाबाई गोपाळ पाटील (2530) राष्ट्रवादी काँग्रेस, पल्लवी शरद पाटील (419) संभाजी बिग्रेड, सरोज धोंडु पाटील (247) अपक्ष, संगिताबाई जानकीराम पाटील (6177) शिवसेना हे पराभूत झाले. * सोनवद बु.-पिंप्री खु. गटातून गोपाल घनश्याम चौधरी (12467) शिवसेना हे विजयी झाले तर तुळशिराम दगडु पाटील (625) राष्टवादी काँग्रेस, वैशाली पंढरीनाथ पाटील (11230) भाजपा हे पराभूत झाले. * पाळधी बु.-बांभोरी प्र.चा. गटातून प्रतापराव गुलाबराव पाटील (12703) शिवसेना हे विजयी झाले तर दिनेश प्रल्हाद चौधरी (2254) भाजपा, रमेश माणिक पाटील (7125) राष्ट्रवादी काँगे्रस हे पराभूत झाले. * साळवे गटातून जनाबाई आसाराम कोळी (3905) शिवसेना हे विजयी झाले तर चंद्ररेखा सतीश पवार (628) संभाजी बिग्रेड, सिताबाई पुना भिल्ल (1478), राष्ट्रवादी काँगे्रस, माधुरी समाधान सोनवणे (3548) भाजपा हे पराभूत झाले.

बांभोरी बु. गटातून शारदा प्रेमराज पाटील (5513) भाजपा हे विजयी झाले तर जनाबाई भगवान पाटील (464) अपक्ष, दिलीप भगवान पाटील (2844) शिवसेना, बेबाबाई सुराजी पाटील (283) संभाजी बिग्रेड, रमेश धुडकू पाटील (229) काँगे्रस, शामक ांत ताराचंद पाटील (1246) राष्ट्रवादी काँग्रेस हे पराभूत झाले. * सोनवद बु. गटातून प्रेमराज बाजीराव पाटील (5556) शिवसेना हे विजयी झाले तर नथ्थुलाल डोंगर चव्हाण (546) अपक्ष, विजय शरद पाटील (453) राष्ट्रवादी काँग्रेस, ईश्‍वर चिंधू सावंत (5326) भाजपा हे पराभूत झाले. * पिंप्री खु. गटातून सुरेखा हिरालाल पाटील (6234) शिवसेना हे विजयी झाले तर श्‍वेता राजेंद्र पाटील (5517) भाजपा, सरलाबाई अरुण बडगुजर (842) राष्ट्रवादी काँग्रेस हे पराभूत झाले. * पाळधी बु. गटातून मुकुंदराव शामराव नन्नवरे (6386) शिवसेना हे विजयी झाले तर किरण त्र्यंबक नन्नवरे (2921) राष्ट्रवादी क ाँग्रेस, नरेंद्र भिमराव नन्नवरे (1006) भाजपा, अरविंद भिमराव मानकरी (470) काँग्रेस, शामराव एकनाथ साळुंखे (144) अपक्ष हे पराभूत झाले. बांभोरी प्र.चा. गटातून मंजुषा सचिन पवार (शिवसेना) 5664 हे विजयी झाले तर कविता राकेश नन्नवरे (1945) भाजपा, छायाबाई रमेश पाटील (3608) राष्ट्रवादी काँग्रेस हे पराभूत झाले.