जळगाव-चोपडा रस्त्यावर भीषण अपघात : सहा प्रवासी गंभीर

Accident at Eicher Kalipilili near Dhanorangaon : Six Passengers Seriously Injured जळगाव : आयशर आणि कालीपीली वाहनाचा समोरासमोर झालेल्या अपघातात सहा प्रवासी जण गंभीर जखमी झाले. हा अपघात जळगाव-चोपडा रस्त्यावरील धानोरा गावाजवळ बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले

अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी
जळगाव-चोपडा रस्त्यावरील धानोरा गावाजवळ चोपडा शहराकडून जळगावकडे येणारी आयशर क्रमांक (एम.एच. 63 सी.4747 ) आणि जळगावकडून चोपड्याकडे प्रवासी घेवून जाणारी कालिपीली (एम.एच.19 बी.यु. 4977) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.

हे प्रवासी जखमी
या अपघातात नितीन सोनवणे (38, शनिपेठ, जळगाव), मनोज गवळी (35, रा.शनिपेठ, जळगाव), शोभाबाई आढाळे (30, पिंप्राळा, जळगाव), श्रीरामरूपसिंग (45), बन्सीलाल सुरसिंग (35), घनश्याम आढळकर (38, सर्व रा.धानोरा) हे जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.