जळगाव। येथील जळगाव जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. यात बँकेच्या निवडणुकीसाठी 31 जुलै रोजी मतदान तर 2 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बीडवई यांनी दिली.
बँकेचा 2022 ते 2027 या कालावधीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 जुलैपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पात्र उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येईल. 31 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. बँकेचे जळगाव जिल्ह्यातून सर्वसाधारण 10 जागा, सर्वसाधारण 2,महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय 1, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 1, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र 1 अशा एकूण 17 संचालकपदाच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.