जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेचा मेळावा

0

शेंदुर्णी । जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेचा मेळावा तसेच वधु-वर बायोडाटा सम्मेलन शेंदुर्णी येथील पारस मंगल कार्यालयात उद्या रविवारी सकाळी 10 वाजेपासुन सुरु होत आहे. या संमेलनासाठी जिल्हाभरातुन संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, समाजाचे उद्योजक, व्यापारी, अधिकारी, तरुण कार्यकर्ते, सल्लागार सदस्य मोठ्या प्रमाणात येणार आहे.

त्यासाठीचे नियोजन जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनचे कार्यध्यक्ष व शेंदुर्णी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपाध्यक्ष दिलीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. जळगाव जिल्हा अध्यक्ष पवन मित्तल व डॉ.सुरेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत अग्रोहा धाम यात्रा, जिल्हा समाज बांधवाची सचीत्र डिरेक्टरी, समाज संघटन, सर्व समाज बाधवाची एकत्रित कुटुंब मेडिकल पालिसी बनविणे,समाजोपयोगी विविध उपक्रम राबवीणे आदी विषयावर मह्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.याच ठिकाणी विवाह योग्य समाजातील तरुण तरुणीचा बायोडाटा देवाण घेवाण सम्मेलन व संघटनेच्या पदाधिकारीची विशेष बैठक आयोजित केली आहे.