जळगाव जिल्हा जागृत मंचच्या पाठपुराव्याने लाभार्थ्यांना अनुदान

0

जळगाव । शनिवार 2 सप्टेंबर रोजी तांबापुरा येथील वैयक्तिक शौचालयाचे अनुदानाचे पात्र 45 लाभार्थी, जळगांव जिल्हा जागृत जनमंचची टीम शिवराम पाटील,अनील नाटेकर,गुरूनाथ सैंदाणे यांचे नेतृत्वाखाली थेट महागरपालिकेत पोहचून आपली कैफीयत मांडली. यावेळी त्यांनी ज्या नागरिकांनी वैयक्तिक शौचालयसाठी अर्ज केले त्यांचे अर्ज अजून मंजूरी नाही का ? अर्ज गहाळ झाले आहेत असा आरोप केला. ज्यांनी लाच दिली त्यांचेच अनुदान पोहचले किंवा त्यांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

अधिकार्‍यांना घेराव
लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला त्यांनी शौचालय बांधून तयार केले पण पुढचा हप्ता मिळालेला नाही. कारण पैसे दिल्याशिवाय पुर्णत्वाचा दाखला नाही. आरोग्याधिकारी विकास पाटील यांचे चेंबरमधे बसून प्रत्येक अर्जदाराची वैयक्तिक नोंद घेतली.
जर पहिला हप्ता मिळाला, लाभार्थीने शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलेले असतांना वर्ष उलटूनही पैसे मिळत नव्हते. पुर्णत्वाचा दाखला मनपाचे अभियंता देत नव्हते लाभार्थी चकरा मारून हैराण झाले होते.
आता मात्र चार दिवसात पुर्णत्वाचे दाखले मनपात जमा करून लाभार्थींना बँक खात्यात पैसे मिळतील असे सांगण्यात आले. शहर हागणदारी मुक्त करण्याची मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉ. पाटील यांना जनमंचच्या टीमने सांगितले.