जळगाव। जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व करणा-या जळगाव जिल्हा अर्बन को-ऑप. बँक्स असोसिएशन लि. जळगाव च्या अध्यक्षपदी जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक सतिष प्रभाकर मदाने यांची तर उपाध्यक्षपदी मॉडर्न अर्बन को-ऑप. बँक लि., चाळीसगावचे अध्यक्ष अशोक हरि खलाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी व्ही.व्ही. देशमुख यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीची सभा घेण्यात आली. इतिवृत्ताचे वाचन देविदास पाटील यांनी केले.
मावळते अध्यक्ष दादा नेवे यांनी पदभार दिला
जळगाव पिपल्स बँकेचे अनिल पाटकर व कर सल्लागार प्रा.जे.एम.अग्रवाल यांची तज्ञ संचालकपदी तर महावीर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे.पवार यांची निमंत्रीत संचालकपदी निवड करण्यात आली. तसेच सहकारी भारती अखिल भारतीय बँक प्रकोष्ठ प्रमुख संजयजी बिर्ला आणि रावेर पिपल्स बँकेचे संचालक सुर्यभान चौधरी यांची विशेष निमंत्रीत संचालकपदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष दादा नेवे यांनी नुतन अध्यक्ष सतिष मदाने यांचेकडे अध्यक्षपदाचा पदभार दिला. नेवे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे कर्ज वसुलीसाठी स्वतंत्र वसुली कक्षाची सुरुवात केली. तसेच बँकांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी वर्ग यांचेसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले.
मान्यवरांनी केले अभिनंदन : निवडीनंतर मावळते अध्यक्ष दादा नेवे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजयजी बिर्ला यांची भारतीय बँक प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच चोपडा पिपल्स को-ऑप. बँकेचे बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांचाही सत्कार करण्यात आला.या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, केशवस्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, महावीर बँकेचे दलुभाऊ जैन, गोदावरी बँकेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील इ. मान्यवरांनी अभिनंदन केले.
जिल्हा बँक्स असोसिएशनच्या सभेत भडगावचे दत्तात्रय पवार, संदिप पगारिया, शरद यावलकर, शांता वाणी, गोदावरी लक्ष्मी बँकेचे संचालक सुरेश प्रेमचंद झोपे, पाचोरा अशोक संघवी, धरणगाव प्रविण कुडे, सचिन पानपाटील, लालचंद सैनानी, पंकज मुंदडा, जळगाव विवेक पाटील, शोभा वाणी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, अनिल राव, पुंडलिक पाटील, विद्याधर दंडवते आदी मान्यवर उपस्थित होते.