जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे नवीन १२ संशयित रुग्ण दाखल

0

अहवाल प्रतीक्षेत

जळगाव – जिल्हा सामान्य रुग्णालयात आज नव्याने कोरोनाचे १२ संशयित रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले आहे. संशयित रुग्णांची संख्या आता १३५ झाली असून ११९ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असुन १२ तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे यांनी दिली जळगाव जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केला असून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत १३५ संशयित रुग्ण रूग्णालयात दाखल झाले असून त्यापैकी ११९ जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत. तर १२ जणांचा तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी आहे. आतापर्यंत २६६९ जणांची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली आहे. तसेच आज नव्याने १२ संशयित रुग्ण रूग्णालयात दाखल झाले असल्याचेही डॉक्टर भास्कर खैरे यांनी कळविले आहे.