जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळातर्फे विविध कार्यक्रम

0

पिंपरी-चिंचवड : जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी, भक्ती-शक्ती चौकात श्रीकृष्ण मंदिराशेजारी असलेल्या मंडळाच्या कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता प्रारंभी झेंडावंदन होणार आहे. त्यानंतर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती लाभणार
या कार्यक्रमांना नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिखले, सिद्धीविनायक समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, डी. डी. पाटील, अनिल परतणे, भारतीताई भारंबे, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बर्‍हाटे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभणार आहे. तरी, या कार्यक्रमास मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी तसेच समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.