जळगाव । जळगाव जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफच्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोजन नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा तर प्रमुख पाहूणे म्हणून चांगदेवराव कडू नगरजिल्हा टीडीएफचे ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरूवातीय सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास व्यासपिठावर पाचही जिल्ह्यातील इच्छूक उमेदवार एस.डी.भिरुड जळगाव, एस.बी.देशमुख नाशिक, राजेंद्र लांडे नगर, अप्पासाहेब शिंदे नगर, निकम उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
अध्यक्षीय भाषणात फिरोज बादशहा यांनी टीडीएफची निर्मितीबद्दल सांगितले. टीडीएफतर्फे दिला जाणारा उमेदवार हा लोकशाही पद्धतीने शिक्षकांसाठी कार्य करणारा शिक्षकांचा समस्या जाणणारा शिक्षक संघटनेचा निष्ठावान कार्यकर्ताच असेल तो कार्यकर्ता मंचांवरील हजर असलेल्या उमेदवारापैकीच असेल, अशी ग्वाही त्यांनी मेळाव्यात दिली. तसेच आमचे शिक्षक काही आर्थिक आमिषांना बळी पडणार नाही व आपल्या शिक्षक मतदार संघाच्या उमेदवार हा निष्ठावान शिक्षकच असेल असे जाहिर केले व त्या उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे मेळाव्याचेे प्रास्ताविक यु.यु. पाटील अध्यक्ष, जिल्हा समन्वय समिती यांनी केले त्यात त्यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला व सध्या सुरु असलेल्या योग्य अयोग्य घडामोडीचा थोडक्यात अहवाल सादर केला. व आपला शिक्षक नेता कसा असावा याबद्दल भुमिका मांडली.
यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण सपकाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सी.सी.वाणी, प्रमोद गरुड, एस के पाटील, अरुण सपकाळे, सुहास चौधरी, एन ओ चौधरी, शंकर वाणी, हेमंत चौधरी, नितिन वंजारी व हरिष तळेले, सतीश भोळे, प्रदिप वाणी, मुकेश बोरोले, गजानन किनगे, प्रा. सुनिल गरुड, कनिष्ठ प्राध्यापक संघटनेचे अजय पाटील व सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.