जळगाव जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र चाळीसगाव प्रांत कार्यालयामार्फत

0

चाळीसगाव-मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. एससीबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून हे आरक्षण देण्यात आले आहे.

दरम्यान आता नवीन आरक्षण आणि प्रवर्गानुसार जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु आहे. प्रांत कार्यालयामार्फत मराठा जात प्रमाणपत्र वितरीत करण्यास सुरुवात झाले आहे. चाळीसगाव विभागाचे प्रांतअधिकारी शरद पवार यांच्या हस्ते राजविर भरत पाटील या विद्यार्थ्यांला आज १४ डिसेंबर रोजी पहिले मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी प्रांत कार्यालयातील कर्मचारी अव्वल कारकून उल्हास देशपांडे, अव्वल कारकून शैलेश रघुवंशी,सेतु समन्वयक अविनाश राजपुत उपस्थित होते.