जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या !

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पोलीस निरिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

याच्या अंतर्गत विनंती बदली, प्रशासकीय रिक्त पद व नियमित पदस्थापना या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात रामकृष्ण कुंभार, जामनेर पोलिस ठाण्यात प्रताप इंगळे, मानव संसाधन विभागासाठी गुलाब पाटील, चाळीसगाव ग्रामीण प्रताप शिकारे, रावेरला रामदास वाकोडे, पाचोरा येथे अनिल शिंदे, एरंडोल पोलिस ठाण्यात अरुण हजारे, भुसावळ बाजारपेठ देविदास पवार, जळगाव शहर वाहतूक शाखा देविदास कुनगर, सायबर क्राईमसाठी अरुण निकम, नियंत्रण कक्ष राजेंद्र परदेशी, आर्थिक गुन्हे शाखेसाठी रणजीत शिरसाठ, सुरक्षा शाखा सुरेश शिंदे, भुसावळ शहर पोलिस ठाणे बाबासाहेब ठोंबे आदींची नियुक्ती करण्यात आली आहेत. तर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसन नजनपाटील, मुक्ताईनगरचे अशोक कडलग यांना त्याच पोलिस स्थानकात एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षकांचे नाव अन् कंसात बदली झालेले ठिकाण असे : समाधान पाटील : एमआयडी जळगाव (मारवड), संदीप पाटील : कासोदा (पोलिस अधीक्षक वाचक), सारीका खैरनार : भुसावळ शहर (भुसावळ बाजारपेठ), सुरेश शिरसाठ : शहर वाहतूक शाखा, चाळीसगाव (एक वर्ष मुदतवाढ), संदीप पाटील : पिंपळगाव हरेश्‍वर (एक वर्ष मुदतवाढ), मनोज पवार : बाजारपेठ, भुसावळ (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), सचिन बेंद्रे : शनिपेठ, जळगाव (पाचोरा), महेश जानकर : जळगाव शहर (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), आशिष रोही : जळगाव शहर (चाळीसगाव शहर), दिलीप शिरसाठ : मेहुणबारे (पहूर), योगेश तांदळे : यावल (चोपडा शहर), सचिन सानप : पाचोरा (वरणगाव), प्रकाश सदगीर : धरणगाव (अमळनेर), हनुमान गायकवाड : शेंदुर्णी ओ.पी. (धरणगाव), जयपाल हिरे : अडावद (मेहुणबारे), सचिन बागुल : जळगाव तालुका (नशिराबाद), राहुलकुमार पाटील : एमआयडीसी कामकाज वाचक १ (अडावद).