Seven criminals deported from Jalgaon district for a year भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या जळगावातील एका उपद्रवीला दोन वर्षांसाठी तर रावेर तालुक्यातील सहा उपद्रवींना एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव व फैजपूर प्रांताधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी दिली.
या आरोपींना केले हद्दपार
रामानंद नगर पोलिस ठाणे हद्दीतील विशाल भिका कोळी (पिंप्राळा, जळगाव) यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तर सै.ईकबाल उर्फ सै.भुर्या अलाउद्दीन (रविवार पेठ, सावदा), शेख रईस उर्फ मास शेख ईस्माईल (गौसिया नगर, सावदा), शेख जाबीर शेख खलील (ख्वाजा नगर, सावदा), विनोद विठ्ठल सातव (रावेर), तुळशिराम सुभाष सावळे (कर्जोद, ता.रावेर), सुनील श्रावण चव्हाण (ऐनपूर, ता.रावेर) यांना प्रत्येकी एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचा पाठपुरावा मोलाचा
सामाजिक शांतता बिडवणार्यांविरोधात कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना दिले होते. त्यानुसार एएसआय युनूस ईब्राहीम शेख, हवालदार पंडित सुनील दामोदरे, नाईक रवींद्र रमेश पाटील आदींनी माहितीयुक्त प्रस्ताव प्रांताधिकारी प्रशासनाकडे सादर केले होते.