जळगाव जिल्ह्यात आणखी ११६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

0

जळगाव :जळगाव जिल्ह्यात आज एका दिवसात तब्बल ११६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २४, भुसावळ ०५, अमळनेर ०३, चोपडा २१, भडगाव ०१, पाचोरा ०१, धरणगाव ०८, यावल ०७, एरंडोल १० तसेच जामनेर ०९, जळगाव ग्रामीण ०३, रावेर ०१, पारोळा १४, मुक्ताईनगर ०३, बोदवड ०६ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२८१ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.