जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीत घट

0

जळगाव । जळगाव जिल्हयात गेल्या 3 महिन्यात गुन्हेगारी कमी झाली असून गुन्हयांचा उकल होण्याचे प्रमाण 80 टक्के असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ.जालींदर सुपेकर यांनी गुरूवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जळगाव जिल्हयात गेल्या 3 महिन्यात गुन्हेगारी कमी झाली असून गुन्हयांचा उकल होण्याचे प्रमाण 80 टक्के असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ.जालींदर सुपेकर यांनी गुरूवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधीकारी सचिन सांगळे उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी माहिती देतांना जळगाव जिल्हया भाग 5 गुन्हे संदर्भात मार्च 2016 अखेरच्या तुलनेत मार्च 2017 पावेतो 152 गुन्ह्यांची घट झालेली आहे.

दारूबंदी सदराखाली 623 केसेस
प्रामुख्याने खुनाचा प्रयत्न 9, दरोडा 1, जबरी चोरी 33, घरफोडी 5, चोरी 9 , दंगे 10, विश्‍वासघात 19, ठकबाजी, बनावट नोटा 1, दुखापत 16, सरकारी नोकरावर हल्ला 8, प्राणांतिक अपघात 14 व इतर भाग 5 सदरात 48 ने घट झालेली आहे. मात्र खुन 1, बलात्कार 3 , पळवून नेणे 10, विनयभंग 14, आत्महत्येस प्रवृत्त करणे 1 अशी गुन्ह्यात वाढ झाली आहे.प्रतिबंध कारवाई सदराखाली सीआरपीसी 107 सदरात 1977 केसेस,सीआरपीसी 109 सदरात 61,सीआरपीसी 110 सदरात 304, सीआरपीसी 151(3) सदरात 4, म.पो.का.क.122 नुसार 13 केसेस तसेच दारु सदरातील अवैध धंद्यात सक्रिय समाजकंटकांविरूध्द 181 प्रस्ताव पाठविले आहे. एम.पी.डी.ए. सदरात 3 कारवाई करण्यात आल्या. तडीपार चे 31 प्रस्ताव पाठविण्यात आले.जुगाराच्या 197 केसेस नोंद करण्यात आल्या असून 390 आरोपींना अटक करून 14 लाख 87 हजार 37 रुपये किंमतीचा मुद्देमाल रोखसह जप्त करण्यात नेआला असून मागील वर्षाच्या तुलनेत 37 ने घट झाली आहे.दारूबंदी सदराखाली 623 केसेस करण्यात आलेल्या असून 490 आरोपींना अटक केली आहे.