नागरीकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
भुसावळ- नाशिकसह जळगाव जिल्ह्यात येत्या पाच दिवसात तापमानाचा उच्चांक 46.5 ते 49.5 अंशापर्यंत वाढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शासनाच्या हवामान खात्याने दिला आहे. या दरम्यान नागरीकांना दक्षता घेवून दुपारी 11 ते सांयकाळी 4.30 वाजेपर्यंत घराबाहेर निघू नये तसेच दिवसभरात जास्तीत जास्त पाच ते सात लिटर पाणी पिण्याचे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यारन, सोमवारी भुसावळ शहरात 46 तर महामार्गावर 47 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या तापमानामूळे शहर व महामार्गावरील रस्ते ओस पडू लागले आहेत.