जळगाव जिल्ह्यात पोलीस कर्मचार्‍यांचे टीमवर्क चांगले

0

जळगाव । पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांची नाशिक येथे प्रशिक्षण केंद्र प्रमुख म्हणून बदली झाली आहे. या बदलीनंतर डॉ. सुपेकर यांनी पत्रकारांसी बातचीत करतांना आपल्या कार्याचा आढावा घेतला. यात त्यांनी जिल्ह्यात पोलीसांचे चांगले टीम वर्क असल्याचे सांगितले. तसचे जिल्ह्यात जातीय सलोख राखून जातीय तनाव दूर करण्यात त्यांचा पुढाकार होता. यासोबतच पोलीस अधिक्षक डॉ.जालींदर सुपेकर यांनी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून 4 ऑगस्ट 2014 रोजी पदभार स्विकारले. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलीस दलासमोर अनेक आव्हाने उभी होती. ही आव्हाने त्यांनी लीलया पेलली.

विविध अभिनव उपक्रम राबविले
सुपेकरांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस प्रशासन आणि जनतेत संवाद व्हावा यासाठी वेबसाईट व अ‍ॅप्सद्वारे उपक्रम राबविले. प्रतिसाद अ‍ॅप्स, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप गृ्रप, ऑनलाईन वाहन चोरी तक्रार पोर्टल, टोल फ्री क्रमांक 1091, सीसीटीव्ही, मोबाईल व्हॅन, ऑनलाईन चरित्र पडताळणी, सायबर सेल, समाधान हेल्पलाईन असे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविले. त्यांनी गुन्हेगार दत्तक योजना, जळगाव पोलीस नेत्र कार्यप्रणाली, युवा सुरक्षा अभियान, नागरी सुविधा केंद्र असे विविध अभियान राबविले.

पोलीसदल केले आधुनिक
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात, डॉ. सुपेकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधून शिबीराचे आयोजन केले. यात शिबीरात 175 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुपेकर यांनी आधुनिकेतेची कास धरत वेबसाईट, अ‍ॅप्सची मदत घेवून पोलीसांची सेवा व पोलीसांना जनतेचे सहकार्य लाभावे यासाठी यांचा वापर करण्यात येत आहे.

आरोग्य शिबीराचे आयोजन
डॉ. सुपेकर यांच्या कार्यकाळात 29 ठिकाणी 56 सीसीटीव्ही कार्यान्वीत करण्यात आले आहे. यासोबतच जून 2015 मध्ये गुन्हेगार दत्तक योजनेस प्रारंभ केला. जिल्हा स्तरावर 827 आरोपी दत्तक घेतले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबीर घेतले. या शिबीरांचा लाभ जवळपास 850 पोलीस अधिकारी व कर्मचारी व 270 पोलीस कुटूंबियांनी याचा लाभ घेतला. गरजूकरींता समुपदेशन कक्ष सुरू केला आहे.