जळगाव जिल्ह्यात सोलर पार्क

0

मुंबई । राज्यातील पाणीपुरवठा आणि उच्च दाब उपसा जलसिंचन ग्राहकांना वीज देयकाची थकबाकी हफ्त्याने भरण्यासाठी शासनाने प्रोत्साहन योजना चालू केल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी त्यांनी जळगावात सोलर पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

शेतीपंपांची 17 हजार कोटी थकबाकी
शेतकर्‍यांकडे शेतीपंपांच्या वीजबिलांची 17 हजार कोटीची थकबाकी आहे. शेतकर्‍यांकडून राज्य सरकार प्रत्येक युनिटमागे 85 पैसे ते एक रूपया 20 पैसे घेते तर वीज विकत घेण्यासाठी प्रत्येक युनिटमागे सहा रूपये खर्च येतो. पाणीपुरवठा व उच्च दाब उपसा सिंचन योजनेतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. ही योजना वीजबिल थकीत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांसाठी लागू राहील. थकीत बिलापैकी 20 टक्के रक्कम व चालू महिन्याचे बिल भरल्यानंतर वीजजोडणी पूर्ववत करण्यात येईल. थकबाकीची उर्वरीत रक्कम चार समान हफ्त्यात भरावी लागणार आहे. सवलत दिलेले हफ्ते चालू वीज बिलासोबत न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी जळगावमध्ये सुमारे 300 एकर जमिनीवर सोलर पार्क उभारण्यात येईल अशी माहिती दिली.