जळगाव जिल्ह्यात १८ कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण २९७

0

जळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगर, शाहूनगर, आर. आर. हायस्कुल परिसर याठिकाणचे अकरा, साईनगर, भुसावळ येथील तीन, भडगाव येथील एक, पाचोरा येथील एक व कोरपावली ता. यावल येथील दोन रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 297 इतकी झाली असून त्यापैकी 77 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तेहतीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.