जळगाव – जळगावात काही ठिकाणी बसेसची तोडफोड झाल्याची घटना समोर आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव डेपोतून सर्व बसेस थांबविण्यात आल्या आहे. दुपारी 2.30 वाजेपासून सर्व फेर्या बंद करण्यात आल्या असून बाहेर गाड्या सुरक्षित ठिकाणी थांबविण्याचे सांगण्यात आले असल्याचे अधिकारी निलिमा बागुल यांनी सांगितले. जळगाव बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. शाळा, कॉलेजेस मधून घरी जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. काही लहान मुलांनी पालकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. सेवा कधी पुर्ववत होईल हे निश्चित नसल्याचेही निलिमा बागुल यांनी सांगितले.