जळगाव – जळगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली संशोधन वृत्ती , सृजनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांना वाव मिळून विकास होण्यासाठी तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्या मध्ये उत्साह वाढवून प्रेरित करण्याच्या उद्दिष्टाने पंचायत समिती ,शिक्षण विभाग जळगाव के.सी.ई. सोसायटी संचालित ए.टी.झांबरे विद्यालय व प.वि.पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील, पं.स.सभापती यामुना रोटे यांच्या हस्ते माजी राष्ट्पती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सर्व विजेत्या बालवैज्ञानिकांना मा.शिक्षण सभापती जि. प.जळगाव पोपट तात्या भोळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले.
त्यांनतर तालुक्यातील काही शिक्षकांनी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात गणेश बागुल (जि.प.शाळा मोहाडी), खुदेजा मॅडम (उर्दू जि.प.केंद्र शाळा नशिराबाद), राजेंद्र पाटील (जि.प.शाळा बोरनार), महेंद्र नेमाडे (ए.टी. झांबरे विद्यालय, जळगाव), मिलिंद कोल्हे (जि.प.शाळा रायपूर), प्रवीण चौधरी (जि.प.शाळा सवखेडा बु.) यांचा सत्कार करण्यात आला. ज्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टींची आवड असते त्याने त्याचा तो गुण जपून आपला विकास करावा. या प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त उपकरण सादर केले आहेत. यातूनच उद्याचे अब्दुल कलाम नक्कीच घडतील. आपण आपले पाल्य इंग्रजी माध्यमाला टाकण्याला प्राधान्य देतो परंतु आज सर्वात जास्त आयएएस व आयपीएस विद्यार्थी हे मराठी माध्यमाचे आहे हे विसरता कामा नये.शासनाने आता मराठी शाळांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा शिपाई व क्लार्क चे पद हवे जेणेकरून शिक्षकांवर असलेल्या अतिरिक्त कामाचा बोजा कमी होईल. अशा शब्दात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना संबोधित केले.
218 उपकरणांचे सादरीकरण
सदर प्रदर्शनामध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे 90, माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे 80, प्राथमिक शिक्षकांचे 28 तर माध्यमिक शिक्षकांचे 20 असे एकूण 218 उपकरणे सादर करण्यात आले.त्यात मॅग्नेट जनरेटर , वेल्थ फ्रॉम वेस्ट , स्मार्ट सिटी , वाटर मॅनेजमेंट , विजबचत करणारे पथदिवे , घरगुती पेरणी यंत्र व कोळपणी यंत्र, गणितीय प्रतिकृती , जलशुद्धीकरण, स्वच्छ भारत
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जि. प.सदस्य पवन सोनवणे, प.स.उपसभापती शीतल पाटील, पं.स.सदस्य ज्योती महाजन, जागृती चौधरी, निर्मला कोळी, रविभाऊ देशमुख, राजाभाऊ रोटे, जनार्दन पाटील ,मुकेश सोनवणे, बीडीओ शशिकांत सोनवणे, उपशिक्षणाधिकारी प्रा.डॉ.डी.एम.देवांग, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक बी.डी.धाडी, माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील, गटशिक्षणाधिकारी कल्पनाताई चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी आर.व्ही.बिऱ्हाडे, प्रतिभा सानप, खलील शेख एफ.ए.पठाण, संस्थेचे शिक्षण समनव्यक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी, मुख्या.दिलीपकुमार चौधरी, रेखा पाटील आदी उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता झांबरे यांनी केले तर आभार पूनम कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या नियोजन या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका उषा नेमाडे, उपशिक्षक योगेश भालेराव, सतीश भोळे, डी.ए.पाटील, बिपीन झोपे, चंद्रकांत कोळी, सरला पाटील, कल्पना तायडे, सुजाता फालक, माधुरी भंगाळे, प्रतिभा लोहार, वंदना मोरे, मनीषा ठोसरे, रोहिणी चौधरी, तृष्णा तळेले, एन.बी.पालवे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.