Jalgaon Taluka Police’s bravery against illegal businesses जळगाव : जळगाव तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र अवलंबत पाच कारवायांमध्ये पाच आरोपींना अटक करीत हजारो रुपयांचे गावठी दारुचे रसायन नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
यांच्यावर झाली कारवाई
भोलाणे येथे संशयीत समाधान पुंडलिक कोळी याच्या ताब्यातून 83 हजार 200 रुपये किंमतीचे तीन हजार पाचशे पन्नास लिटर कच्चे-पक्के रसायन जप्त करण्यात आले तसेच 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली तर भोलाणे गावातील अनिल एकनाथ कोळी याच्या ताब्यातून 69 हजार 200 रुपये किंमतीचे दोन हजार 950 लिटर कच्चे-पक्के रसायन व 30 लिटर दारू जप्त करण्यात आली व विनोद आत्माराम कोळी (भोलाणे) याच्या ताब्यातून एक हजार दोनशे रुपये किंमतीची 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. फुपनगरी येथे विक्रम सीताराम सपकाळे याच्या ताब्यातून 750 रुपये किंमतीची 15 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली तसेच फुपणी येथे भिकन अवचित सपकाळे याच्या ताब्यातून एक हजार रुपये किंमतीची 20 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र राबवण्यात आले.