जळगाव तालुक्यातील ग्रा.पं.निवडणूक निकाल जाहीर

0

जळगाव – जळगाव तालुक्यातील 10 धामणगाव, निमगाव बुद्रुक, खेडी खुर्द, डोमगाव, पाथरी, लोणवाडी बुद्रुक, विटनेर, बिलवाडी, सुभाषवाडी जामोद या दहा ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. जळगावत तालुक्यातील ग्रामपंचायतींकरीता 84.75 टक्के मतदान झाले होते. तहसिल कार्यालयाजवळील कै.आमदार आप्पासाहब भास्करराव पाटील सभागृहात मतमोजणी मतमोजणी करण्यात आली. बुधवारी सकाळी 11 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. दिड तासात दुपारी 12.30 वाजेपर्यत सर्व दहा ग्रामपंचायतींचे निकाल घोषीत करण्यात आले. तहसिलदार अमोल निकम यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली.

निमगाव बुद्रुक सरपंचपदी प्रियंका रविंद्र पाटील यांची, डोमगाव सरपंचपदी हिलाल श्रावण सुरवाडे, धामणगाव सरंपचपदी रंजना महेंद्रकुमार मंडोरे, खेडी सरपंचपदी जळगाव कृउबा उपसभापती कैलान छगन चौधरी यांच्या पत्नी माधुरी कैलास चौधरी, सुभाषवाडी सरपंचपदी राजाराम धिंगा चव्हाण, पाथरीचे सरपंच म्हणून शिरीष रामराव जाधव,बिलवाडी सरपंचपदी सुलभाबाई भरत पाटील, उषाबाई मधुकर पाटील, विटनेर चवदास सदाशिव कोळी यांची निवड झाली आहे. जळगाव तालुक्यातील पळसोद ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची निवड यापूर्वीच बिनविरोध करण्यात आली आहे तर निमगाव बुद्रुकचे 7, खेडी खुर्द 1, डोमगाव 3, लोणवाडी बुद्रुक 6, विटनेर 2, बिलवाडी जामोद ग्रामपंचायतमध्ये सदस्य बिनविरोध निवडूण आले होते.