जळगाव: तालुक्यातील सत्तर ग्रामपंचायतीच्या सरंपचपदाचे आरक्षण आज काढण्यात आले. यात 36 ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद राखीव झाले तर 34 ठिकाणी पुरूषांसाठीच्या जागेवर आरक्षण काढण्यात आले. यामुळे तालुक्यात 70 पैकी 36 ठिकाणी सरपंचपदावर ‘महिलाराज’ येणार आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी जागा आरक्षीत केली असली तरी त्या ठिकाणी त्या जाती/जमातीची महिला उमेदवार नाही, त्या ठिकाणी सरंपच कसा निवडणार याविषयावर ग्रामस्थांनी काही वेळ गोंधळ घातला होता. नंतर मात्र प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज करून ते निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवतील. आयोग त्यांना मार्गदर्शन करून आरक्षण काढायला सांगतील असे सांगितल्यानंतर गोंधळ
शांत झाला.
जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण आज पंचायतीच्या समिती सभागृहात काढण्यात आले. प्रांताधिकारी प्रसाद मते अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सोनवणे, नायब तहसीलदार चंदनकर उपस्थित होते. आरक्षणावेळी विविध राजकीय पदाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. अगोदर असलेल्या पुरूष आरक्षणाच्या जागेवर महिलांसाठी आरक्षण निघाल्याने अनेकांचे राजकीय गणित गडबडले आहे. तर महिलांचे आरक्षण निघाल्याने अनेक ठिकाणी जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. सम्यक योगेश नन्नवरे (वय 12) या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.
असे आहे सरपंच पदाचे आरक्षण
अनुसूचित जाती (पुरूष)- वावडदे-बिलखेडा, तरसोद, विदगाव. (महिला)- म्हसावद, पाथरी, रायपूर.
अनुसूचित जमातीसाठी- (पुरूष)- वडली, जवखेडे, भोलाणे, करंज, पिलखेडे, धामणगांव, शेळगाव, आवार. (महिला)- असोदा, शिरसोला प्र.न., धानवड, नशिराबाद, सुजदे, घार्डी, रिधूर, देउळवाडे, फुपणी.
नामाप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग)- (पुरूष) – गाढोदे, भादली बुद्रूक, चिंचोली, शिरसोली प्र.बो, खेडी खुर्दू, ममुराबाद, जळके, (ईश्वर चिठ्ठीद्वारे)- जामोद, मोहाडी, (महिला)- नांद्रा बु, कंडारी, आव्हाणे, लमांजन, डोमगांव, रामदेववाडी, (ईश्वर चिठ्ठीद्वारे)- सुभाषवाडी, उमाळे, सावखेडा खुर्द, बोरनार.
सर्वसाधारण पदासाठी आरक्षण- (पुरूष) – सावखेडा बुद्रूक, दापोरा, धानोरे बुद्रूक, कानळदा, जळगाव खुर्द, वडनगरी, किनोद, वसंतवाडी, निमगांव बुद्रूक, बिलवाडी, लोणवाडी बुद्रूक, आमोदे बुद्रूक, बेळी. (महिला)- डिकसाई, कठोरा, भोकर, मन्यारखेडे, कुसूंबे खुर्द, कडगांव, नांद्रा खुर्द, भादली खुर्द, वराड बुर्द्रुक, विटनेर, पळसोद, नंदगांव, फुपनगरी, तुरखेडे, कुंवारखेडे.