चाळीसगाव – गेल्या सप्ताहापासून नागरिकांनाच्या विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेबाबत तक्रारी येत आहेत. मी डी.आर.एम यांच्याशी संपर्क केला असून या मार्गावरून धावणार्या काही प्रवाशी गाड्या थांबविणे शक्य आहे का? याची चाचपणी करायच्या सूचना दिल्या असून शक्य झाल्यास देवळाली ते जळगाव पर्यत पॅसेंजर सुरू व्हावी, यासाठी मी दोन दिवसांनी दिल्लीहुन आल्यावर डी. आर. एम यांच्याशी चर्चा करणार असून प्रवाशांच्या गैरसोयी बाबत तोडगा काढला जाईल, अशी माहिती खासदार ए. टी. नाना पाटील यांनी दिल्लीहून ‘जनशक्ती’शी बोलताना दिली आहे.
गेल्या आठवड्यापासून देवळालीहुन भुसावळ कडे धावणारी शटल रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान भादली जवळ रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने ही गाडी बंद करण्यात आली आहे, मात्र त्या पाठोपाठ महाराष्ट्र एक्सप्रेस बंद करण्यात येणार आहे तसेच काशी एक्सप्रेसला देखील काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
आधीच कामायनी एक्सप्रेस बंद असल्याने प्रवाश्यांचे बेसुमार हाल सुरू आहेत त्यातच शटल सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून नोकरीच्या निमित्ताने अप डाऊन करणारे चाकरमानी देखील हैराण झाले आहेत. त्यातच एसटीची भाडेवाढ झाली असल्याने जळगावी जाणार्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याचा गोरगरीब जनतेला फटका सहन करावा लागत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येत आहे. याबाबतीत जनशक्ती ने खासदार ए टी नाना पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी खासदार पाटील यांनी