जळगाव। जळगांव जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव व पाचोरा या विभागातील वीज पुरवठा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवार 8 जुलै, 2017 रोजी तीन ते सहा तास बंद राहणार आहे. तरी सर्व सन्माननीय वीजग्राहकांना महावितरणच्या वतीने सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे. कामे वेळेच्या आत पुर्ण झाल्यास विद्यूत पुरवठा त्वरीत सुरु करण्यात येईल. कृपया संबंधित वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. खालीलप्रमाणे नमुद केलेल्या उपकेंद्र व फिडर (वीज वाहिनी) वरील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
धरणगाव विभाग – 132 केव्ही अमळनेर उपकेंद्रातून निघणार्या 33/11 केव्ही जानवे उपकेंद्रावरील डांगर, रणाईच, लोंढवे या 11 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा दुपारी 2 ते दुपारी 05 या तीन तासाकरीता बंद राहणार आहे. जळगाव विभाग – 11 केव्ही रिंग रोड फिडरवर नवीन रोहित्र उभारणी करण्याकामी रिंगरोड परिसर, नुतन मराठा महाविद्यालय परिसर, कोर्ट चौक परिसर, शाहु नगर हौसिंग सोसायटी, प्रतापनगर या भागातील वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत बंद राहील. पाचोरा विभाग – 33 केव्ही भडगांव, वडजी, कोळगांव या तीन उपकेंद्रावरील सर्व 11 केव्ही वीज वाहिन्या (फिडर) बंद राहणार आहेत. त्यामुळे भडगांव, नाचणखेडा, गुढे, कोळगांव, जुवार्डी, कोठली, महिंदळे, निंभोरा, वडगांव बलद, पिंप्रीहात, पेंडगांव या गावांचा वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 4 या सहा तासाकरीता बंद राहील.