जळगाव । नुकतीच जळगाव तालुका पंचायत समितीची निवडणुक घेण्यात आली आहे. पंचायत समितीची कार्यकारिणी देखील स्थापन झाली आहे. घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकाम, विविध योजनांचे कामकाज मंद गतीने सुरु असल्याचे दिसून येत होते. पंचायत समितीच्या कामकाजा बाबत तालुक्यातील नागरिकांची नेहमीची तक्रार असासायची. मात्र नवनियुक्त सदस्य सातत्याने पाठपुरवठा करत असल्याने पंचायत समितीच्या कामाजाची गती वाढली असल्याचे मासिक आढावा बैठकीतुन दिसून आले. यावेळी घरकुल योजना, राशी 659 वरील बंदी उठविणे, डिजीटल कामकाज वाढविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
आपले सरकार केंद्र सुरु करण्या बाबत चर्चा
इंदिरा आवास योजनेंतर्गत 332 लाभार्थ्यांपैकी फक्त 31 लाभार्थ्यांनाच पुर्ण अनुदान देण्यात आले होते. महिन्याभरात ही संख्या 125 वर गेली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2017-18 यावर्षी 844 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. राशी 659 या बियाण्याची शेतकर्यांकडून सर्वाधिक मागणी असून त्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे ठरावद्वारे करण्यात आली. जळगाव पंचायत समितीत आपले सरकार केंद्र सुरु करण्यात यावे जेणे करुन डिजीटल क्रांतीकडे वाटचाल होईल आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला सभापती यमुना रोटे, उपसभापती शितल पाटील, गटविकास अधिकारी शकुंतला चौधरी, अॅड.हर्षल चौधरी, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.