उपसभापतीपदी संगीता चिंचोरे; निवडीनंतर ना. गुलाबराव पाटीलांनी केला सत्कार
जळगाव: पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी गुरुवारी २ रोजी निवड प्रक्रिया पार पडली. जळगाव पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड ही बिनविरोध झाली. सभापतीपदी शिरसोली गणाचे नंदलाल पाटील तर उपसभापतीपदी म्हसावद गणाच्या संगीता चिंचोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, हेमंत पाटील हे सहाय्यक म्हणून होते. निवडीनंतर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले.
अशी झाली निवड प्रक्रिया
जळगाव पंचायत समितीवर सभापती पदासाठी ओबीसी पुरूष आरक्षण निघाले होते. शिवाय जळगाव पंचायतीवर शिवसेनेचेच वर्चस्व आहे. शिवसेनेचे 5, भाजप 3 आणि अपक्ष 2 सदस्य आहेत. यामुळे येथे आगामी अडीच वर्षाकरीता शिवसेनेचे सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. सभापती निवडीसाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान अर्ज सादर करावयाचा होता. पंचायत समितीत भाजपचे संख्याबळ नसल्याने सभापती पदासाठी नंदलाल पाटील आणि उपसभापती पदासाठी संगीता चिंचोरे यांनी अर्ज सादर केले होते. यानंतर दुपारी तीनला
या नंतर दुपारी तीनला शिवसेनेची आतिषबाजी
सभापती व उपसभापती निवडीसाठी एक- एकच अर्ज होते. यात सभापती पदासाठी नंदलाल पाटील यांच्या नावासाठी ललीता सोनवणे तर संगीता चिंचोरे यांच्या नावासाठी जागृती चौधरी सुचक होते. एक- एकच अर्ज असल्याने दोघांचीही निवड बिनविरोध करण्यात येत असल्याचे पिठासन अधिकारी आहेर यांनी घोषित केले. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या आवारात फटाके फोडत व ढोल वाजवून जल्लोष केला. यानंतर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सभापती नंदलाल पाटील व उपसभापती संगीता चिंचोरे यांचा सत्कार करण्यात आला. निवड प्रक्रियेत पंचायत समितीच्या माजी सभापती यमुना रोटे, शीतल पाटील, हर्षल चौधरी, ललीत पाटील, ज्योती महाजन, जागृती चौधरी, विमलबाई बागुल, निर्मला कोळी आदी उपस्थित होते.
गेल्या 25 वर्षापासून पक्षाचे काम करत असून त्याची पावती म्हणून सभापती पद मिळाले. सभापती झालो असलो, तरी तळागाळातील जनतेचे काम करत राहणार. शिवाय पंचायत समिती ग्रामीण भागाचा आत्मा असून त्यांना न्याय देण्याचे काम करेल: नंदलाल पाटील, सभापती, पंचायत समिती जळगाव.