जळगाव । समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्राप्त व्हावे तसेच कुणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचीत राहू नये, हा एकमेव उद्देश. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य व्हावे, ह्या उद्देशाने जळगाव पीपल्स को-ऑप बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट द्वारा जळगाव शहर म.न.पा.ची सेंट्रल स्कूल नं.3 ही बंद असलेली शाळा आता जळगाव पब्लिक स्कूल जळगावकरांच्या सेवेत सुरु होत आहे. ही नवीन शाळा उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या नियंत्रणाखाली राहील. ज्ञानार्जनाला श्रेष्ठदान मानणार्या जळगाव पीपल्स बँक ट्रस्टच्या जगाच्या आधुनिक पद्धतीचे शिक्षण मुलांना मिळावे, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त सोयीचे व्हावे, म्हणून स्कूलचे सी.बी.एस.ई. पॅटर्नची पद्धती अवलंबिली आहे. सदरील शाळेत सुरवातीस नर्सरी ते इयत्ता पहिलीचे वर्ग येणार्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. शाळा जरी नवीन असली तरी तिच्या पाठीशी शिक्षण व व्यवस्थापन क्षेत्रातील सेवाभावी, समर्पित तज्ञ असे संचालक मंडळ असणार आहे.
शाळा उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या नियंत्रणाखाली
शहरातील नव्या पिढीतील मुला-मुलींना नितीमल्यांसह त्यांच्या सुप्त गुणांना पैलु पाडून त्यांना उद्याचा सक्षम सुसंस्कृत नागरिक बनविणे हे शाळेचे प्राथमिक व महत्वपूर्ण ध्येय असणार आहे. मुलांना घडविण्यासाठी पैलु पाडण्यासाठी, उच्च शिक्षीत, अनुभवी व गुणवत्ता धारक शिक्षक या कामी सज्ज असणार आहे. विद्यार्थी व शिक्षक यात परस्पर संवाद, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन तसेच नियमीत मुल्यांकन पद्धती याद्वारा शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतील. शाळेचा परिसर शैक्षणिक दृष्ट्या प्रशस्त, स्वच्छ व सुंदर राहणार असून त्यात शुद्ध पाणी तसेच इतर अत्यावश्यक सेवा-सुविधा तसेच शैक्षणिक साहित्यांची परिपुर्तता करण्यात येणार आहे. प्रशस्त इमारत सर्व सुविधांनी परिपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुसज्ज लायब्ररी ई-क्लासरुम इत्यांदीचा यात समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे खेळण्यासाठी व खेळातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास पुरक असे खेळ व त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री अग्रस्थानी असणार आहे. शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना विविध खेळ व स्पर्धांमध्ये सहभागाकरीता प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यात शालेपोयोगी वस्तू मोफत वस्तू विनामुल्य देण्यात येणार आहे. शाळा 16 जूनपासून जळगावकरांच्या सेवेत पांझरापोळ टाकीशेजारी, नेरी नाक्याजवळ सुरु होत असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून प्रवेशासाठी डोनेशन व फी घेतली जाणार नाही. सर्व संबंधित पालकांना नोंदणीचे आवाहन जळगाव पीपल्स को.ऑप. बॅकेचे चेअरमन तथा ट्रस्टचे व्हा. चेअरमन भालचंद्र पाटील, उमवि माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. देविदास सरोदे, चंदन अत्तरदे यांनी आयोजित पत्रकार परीषदेत केले आहे.