Inspection of Bhusawal-Pachora 3rd Railway Line भुसावळ : भुसावळ-जळगाव व जळगाव-पाचोरा या तिसर्या रेल्वे लाईनचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी गुरुवारी ट्रॉलीच्या माध्यमातून निरीक्षण केले. मुख्य सुरक्षा अधिकारी यांची विशेष गाडी भुसावळात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दाखल झाल्यानंतर ते सकाळी आठ वाजता जळगावकडे रवाना झाले तर तिसर्या लाईनद्वारे म्हसावद गाठल्यानंतर सहा मोटार ट्रॉलीद्वारे मुख्य सुरक्षा अधिकार्यांच्या विशेष चमूने रेल्वे मार्गाचे निरीक्षण केले.
मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा यांनी निरीक्षण 1-1 किलोमीटर अंतरावर निरीक्षण केले. यावेळी पूलाचे निरीक्षण केल्यानंतर काही महत्वपूर्ण सूचनाही करण्यात आल्या. गुरुवारी पहिल्या दिवशी भुसावळ-माहिजीपर्यंत निरीक्षण करण्यात आले तर शुक्रवारी माहिजी ते पाचोरा दरम्यान निरीक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, या निरीक्षण अहवालानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी भुसावळसह मुंबईतील सहा अधिकार्यांच्या चमूद्वारे ट्रॉलीत बसून प्रत्येकी एक-एक किलोमीटर अंतरापर्यंत निरीक्षण केले तसेच रेल्वे रूळासह अन्य बाबींबाबत संबंधित अधिकार्यांना मार्गदर्शन करीत सूचनाही केल्या. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यास प्रामुख्याने मालगाड्यांसाठी तो वापरला जाणार आहे.