जळगाव पीपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात!

0

जळगाव । दिज्य जळगाव । दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेची 84वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 17 जून 2018 रोजी सकाळी 8.30 वाजता यशवंतराव पाटील मुक्तांगण हॉलमध्ये उत्साहात पार पडली. यावर्षी बँकेस संपूर्ण भारतातून दिला जाणारा बेस्ट अ‍ॅक्सेसेबल वेबसाईट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्याहस्ते आपल्या दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेला प्रदान करण्यात आला. बँकेच्या या ऐतिहासीक सन्मानाबद्दल बँकेचे माननीय सभासदांतर्फे बँकेचा गौरव करण्यात आला. बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील व कल्पना पाटील यांच्याहस्ते पालखीची पूजा करण्यात आली. रुखमाटेंट, नेरी नाका येथून बँकेस मिळालेला पुरस्कार पालखीमध्ये विराजमान करुन वारकरी मंडळीच्या सोबत दिंडी काढण्यात आली. प्रवेशव्दारात बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांचे औक्षण करण्यात आले. सदर दिंडीसाठी बँकेचे ज्येष्ठ सभासद विश्‍वनाथ चौधरी, प्रकाश सराफ, दिनकरमहाराज कडगावकर, प्रभाकर पाटील व इतर सभासदांचे विशेष सहकार्य लाभले.

मिळालेला पुरस्कार सभासदांना समर्पित
सभा सुरु होण्याआधी बँकेस मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराची दिल्ली येथील चित्रफीत सर्व सभासदांना दाखविण्यात आली. बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी बँकेचे अहवाल वर्षातील कार्याबद्दल आणि भारतातील एकूणच आर्थिक परिस्थितीत होणार्‍या घडामोडींबद्दल सांगीतले. तसेच आपल्या मनोगतात राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याच्या अविस्मरणीय अनुभव सांगितला. अहवाल वर्षातील सर्व पुरस्कार त्यांनी सभासदांना व ग्राहकांना समर्पित केले. गेल्या वर्षभरातील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा आढावा मांडला. बँकेच्या ठेवी व कर्जातील वाढीबद्दल सांगीतले. तसेच बँकेचे कासा ठेवींचे प्रमाण 29 टक्के पयरत वाढले आहे. या कासावाढीमुळे बँक क र्जाचे व्याजदर अंशत: कमी करु शकली आहे असे नमूद केले. एनपीएचे प्रमाण मागील आर्थिक वर्षापेक्षा कमीत कमी करण्यासाठी बँकेची टीम प्रयत्नशिल आहे याची माहिती दिली.

बँकेच्या विविध योजना
भविष्यातील डिजीटल बँकिंगचा विस्तार लक्षात घेता, ग्राहकांच्या डिजीटल व्यवहारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, बँकेने इन्फोसिस कंपनीचे जगप्रसिद्ध फिनॅकल सॉफ्टवेअर विकत घेतले असून संपूर्ण कार्यप्रणाली यावर्षी या सॉफ्टवेअरव्दारे कार्यान्वीत केली जाईल. सदर सॉफ्टवेअरचा ग्राहकांना अत्याधुनिक सेवासुविधा देण्यासाठी उपयोग होईल. तसेच बँकेच्या नवीन तंत्रज्ञानयु3त सेवा सुविधांबद्दल माहिती दिली.ग्राहकाने नवीन खाते उघडल्यास त्याला त्वरीत व्यवहारासाठी इन्स्टा एटीएम कम डेबिट कार्ड उपलब्ध करुन देण्यात येते. कॅशलेस व्यवहारासाठी बँकेने मोबाईल बँकिग सुविधा, पिओएस स्वाईप मशिन सुविधा, आरटीजीएस व एनइएफटी सुविधा अशा त्वरीत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

यांची होती उपस्थिती
सभेस बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, संचालक दत्तात्रय चौधरी, डॉ.सी.बी.चौधरी, सुरेखा चौधरी, स्मिता पाटील, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, रामेश्‍वर जाखेटे, चंदन अत्तरदे, डॉ.सुहास महाजन, अनिकेत पाटील, राजेश परमार, तज्ञ संचालक जे.एम.अग्रवाल, प्रबंध संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटकर, सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख, उपमहाव्यवस्थापक स्वाती सारडा तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन बँकेचे ज्येष्ठ संचालक डॅा.सी.बी.चौधरी यांनी केले आणि आभार प्रदर्शन संचालक अनिकेत पाटील यांनी केले.