जळगाव पीपल्स बँकेच्या एटीएमचा शुभारंभ

0

जळगाव । दि जळगाव पीपल्स को-ऑफ बँक शाखेच्या अजुन एका एटीएम सेवेला लेवा बोर्डींग येथे प्रारंभ झाला. शुभारंभ लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी चौधरी यांचे शुभहस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ सभासद व ठेवीदार पती-पत्नी निळकंठ पाटील याच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक 40 शाखांसह महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे कार्यरत आहे. बँकेचे 32 ऑनसाईट एटीएम्स व 2 ऑफसाईट एटीएम्स आहेत. आज रोजी बँकेच्या लेवा बोर्डींग शाखेत एटीएम सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी डॉ. सुभाषजी चौधरी उपस्थित होते. त्यांनी बँकेच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करून बँक देत असलेल्या आर्थिक सेवांसोबत विविध उपक्रमांबद्दलही बँकेचे कौतूक केले. बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी बँकेच्या सेवासुविधांबाबत माहिती दिली. लेवा बोर्डींग शाखेच्या ग्राहकवर्गास अधिक जलद सेवा देण्यासाठी एटीएमचा उपयोग होईल आणि ग्राहकांनी एटीएम व कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.

ग्राहकाने नवीन खाते उघडल्यास त्याला त्वरीत व्यवहारासाठी इन्स्टा एटीएम कम डेबिट कार्ड उपलब्ध करुन देण्यात येते. जेणेकरुन ग्राहकाची गैरसोय होणार नाही याची बँकेने दक्षता घेत असते. कॅशलेस व्यवहारासाठी बँकेने मोबाईल बँकिग सुविधा, पिओएस स्वाईप मशिन सुविधा, आरटीजीएस व एनइएफटी सुविधा अशा त्वरीत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेची एटीएम कम डेबिट कार्ड सुविधा बचत तसेच प्रोप्रायटरी चालु खात्यावरही उपलब्ध आहे. डेबिट कार्ड सर्व बँकाच्या एटीएम मध्ये वापरता येते. रुपे पीओएस मशीन उपलब्ध असणार्‍या मॉल्स, मल्टिप्लेक्स, पेट्रोल पंप इ. स्वॅपिंग करता येते. या कार्डव्दारे वीज,फोन,बिल, ऑनलाईन पेमेट, शॉपिंग, रेल्वे रिझर्वेशन, करता येते. बँक सीटीएस, आरटीजीएस, एनइएफ टी, एसएमएस अलर्टस् , इमेलवर खातेउतारा, लॉकर्स, पॅन कार्ड वितरण, एलआयसी, एसबीआय लाईफ व आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या विमा योजना अशा विविध सेवासुविधा पुरवीत आहे. सदर कार्यक्रमास बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, संचालक डॉ. सी.बी.चौधरी, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, स्मिता पाटील, सुरेखा चौधरी, चंदन अत्तरदे, अनिकेत पाटील, प्रबंध संचालक व सीईओ अनिल पाटकर, दिलीप देशमुख तसेच बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.