M. Rajkumar Jalgaon New Superintendent of Police : Dr. Praveen Mundhe transferred जळगाव : जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून जिल्ह्याच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी एम.राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजकुमार हे नागपूर लोहमार्ग येथून बदलून येत आहेत. राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवारी रात्री उशिरा अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
धुळे पोलिस अधीक्षकांची बदली
नाशिक शहरचे उपायुक्त संजय ए.बारकुंडे यांची धुळे पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, जळगावचे डॉ.प्रवीण मुंढे व धुळ्याचे प्रवीणकुमार पाटील यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण मिळालेले नसून लवकरच त्याबाबतही आदेश निघणार असल्याचे बदली आदेशात नमूद आहे.