जळगाव । शहरातील 22 प्रभागामध्ये साफसफाई ठेक्याच्या माध्यमाने तर मनपाचे अंदाजे 400 ते 450 सफाई कामगारांच्या माध्यमाने उर्वरित 15 प्रभागात स्वच्छतेची कामे केली जातात. परंतु संपूर्ण शहरातून साफसफाईच्या बाबतीत अनेक तक्रारी समोर येत असल्याचे जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच पावसाने शहरवासीयांची फजिती उडवली व जनजीवन विस्कळीत केल. या धर्तीवर जळगाव शहराच्या बहुतांश भागातील साफसफाईचे मेगा सर्वेक्षण करण्याचे नियोजन जळगाव फर्स्ट ने केले आहे. यानुसार शहराच्या समस्येचे निट वर्गीकरण करता यावे त्यासाठी 6 विभागात विभागणी केली आहे. त्या प्रत्येक भागात दोन,चार सेवकांचे हॉटसअप मोबाईल क्र. देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात त्या प्रत्येक विभागात 5 ते 6 प्रभागातील वेगवेगळ्या रहिवाशी भागातील स्वयंसेवक स्वतः सहभागी होऊन रविवारी दि.18 जून सकाळी 6:00 ते 8:00 दरम्यान फोटो काढून सर्वेक्षण करतील नागरिकांनी त्यांच्या भागातील स्वयंसेवकाशी संपर्क करून तक्रार नोंदवावी.
व्हॉटसअपद्वारे मागविले फोटो
ज्या नागरिकांना आपल्या भागातील साफसफाई विषयी समस्या नोंदवायची असेल त्यांनी वरील मोबाईल वर व्हॉटस् अपवर फोटो काढून एरिया प्रमाणे पाठवावा. नागरिकांचा कररूपाने भरलेला घामाचा पैसा सत्कारणी लागला पहिजे. जो पैसा मनपा साफसफाई साठी खर्च करीत आहे त्याच्या मोबदल्यात खरच काम झाले पाहिजे.
शहरातील विविध भागातील गृप अॅडमिन
मोहिमेचा उद्देश म्हणजे सर्व शहरात साफसफाईसाठी ठेक्याचे 67 लाख 450 कर्मचारीचे वेतन सह 1.25 ते 1.5 कोटी मनपा खर्च करते तरी देखील मोठ्या प्रमाणात साफसफाई च्या तक्रारी येतात साफसफाई ची वस्तुस्थीती प्रशासनाला कळावी गांभीर्य कळावे हा उद्देश असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. यात परिसरनुसार ग्रुप अॅडमीन जळगाव फर्स्ट. 1, विशालभाई वाघ मो 8087288869, शिवाजी नगर, गेंदालाल मिल, दुध फेडरेशन, कानळदा रोड,कुंभारवाडा, दाळफळ, इंद्रप्रस्थ नगर,भुरे मामलेदार प्लॉट. जळगाव फर्स्ट.2, विजय पाटील 9767075165, योगेश पाटील.8275270470 गणेश कॉलनी,चंद्रप्रभा कॉलनी,शाहू नगर, जिल्हापेठ पो.स्टे. प्रताप नगर .नंदनवन कॉलनी,रिंगरोड,महेश प्रगती, रोड, कोर्ट रोड, भास्कर मार्केट,विद्युत कॉलनी,शिव कॉलनी,भूषण कॉलनी,आशा बाबा नगर. जळगाव फर्स्ट.3, अनिल साळुंखे . 9665507788राकेश पाटील मो.7058585870 भोईटे नगर,एस एम आय टी , मुक्ताईनगर,निवृत्तीनंतर ,खोटे नगर , आहुजा नगर,इंद्रनील सोसायटी, ,श्रीराम नगर,श्रीरत्न कॉलनी,दादावाडी ,अष्टभुजा नगर .पिंप्राळा गाव , पिंप्राळा हुडको. जळगाव फर्स्ट.4, डॉ.विकास निकम मो..9850484722,चेतन पाटील. 9975481246 एम जे कॉलेज,गुरुदत्त कॉलनी,सागर पार्क,रामानंद नगर, हरीविठ्ठल नगर , महाबळ ते समता नगर, साने गुरुजी कॉलनी ,गणपती नगर ,आदर्श नगर ,नेहरू नगर. जळगाव फर्स्ट. 5,अश्फाक पिंजारी 9823378611, मेहरूण,तांबापुरा,अक्सा नगर ,सुप्रीम कॉलनी,रामेश्वर कॉलनी,सिंद्धी कॉलनी,अयोध्या नगर. जळगाव फर्स्ट. 6, मनोज चौधरी 9960382670 नवीपेठ,बळीरामपेठ,टावर,दाणाबाजार, शनिपेठ,आसोदा रोड, वाल्मिक नगर,कांचन नगर, जुने जळगाव,ईश्वर कॉलनी, गणेशवाडी. तुकाराम् वाडी. समन्वयासाठी व अडचणीसाठी डॉ राधेश्याम चौधरी मो.9422771474 संपर्क साधावा.