जळगाव । डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या जळगाव फर्स्टतर्फे सहा ग्रृपद्वारे स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण रविवारी शहरात करण्यात आले. यात त्यांनी नागरिकांना त्यांच्या भागातील रस्ते, गटारी, कचरा कुंड्या यांची सफाई होत नसल्यास त्याचा फोटो व्हॉटस्अपवर मागविला होते. या सर्वेक्षणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शहरातील जवळपास 700 नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेत फोटो पाठविले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच पावसाने शहरवासीयांची फजिती उडवली व जनजीवन विस्कळीत केल.या धर्तीवर शहराच्या बहुतांश भागातील साफसफाईचे मेगा सर्वेक्षण जळगाव फर्स्टतर्फे करण्यात
स्वच्छतेचा दावा फोल
शहरातील 22 प्रभागामध्ये साफसफाई ठेक्याच्या माध्यमाने तर मनपाचे अंदाजे 400 ते 450 सफाई कामगारांच्या माध्यमाने उर्वरित 15 प्रभागात स्वच्छतेची कामे केली जातात.परंतु संपूर्ण शहरातून साफसफाईच्या बाबतीत अनेक तक्रारी समोर येत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते, गटारी, नाले यांच्यासह शहराच्या साफसफाईचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. महापालिकेतर्फे स्वच्छता असल्याचा दावा करण्यात येत असला तरी तो किती फोल आहे हे या सर्वेक्षणातून दिसून आला. शहरातील सर्वंच भागातून रस्ते, गटारी, नाले यांच्या सफाईबाबत तक्रार नोंदविण्यात आली. हे सर्वेक्षण सकाळी 6 ते 10 यावेळेत करण्यात आले. यासाठी जळगाव फर्स्टतर्फे सहा ग्रृप तयार करण्यात आले होते. झोपडपट्टी भागातील नागरिकांनीच सफाई होत नसल्याची तक्रार केली नाही तर शहरातील सर्वच भागातून तक्रारींचा ओघ दिसून आला.
व्हॉटस्अपच्या माध्यमातून माहिती जमा
या मोहिमेचा उद्देश हा सर्व शहरात साफसफाईसाठी ठेक्याचे 67 लाख 450 कर्मचारीचे वेतनासह 1.25 ते 1.5 कोटी मनपा खर्च करते. जास्त प्रमाणात खर्च स्वच्छतेवर करण्यात येत असला तरी देखील मोठ्या प्रमाणात साफसफाईच्या तक्रारी येतात. या तक्रारी व्हॉटस्अपच्या माध्यमातून जमा करून हा डाटा आरोग्य विभागास दिला तर त्यांना मदत होईल साफसफाई ची वस्तुस्थीती प्रशासनाला साफसफाईचे गांभिर्य कळेल हा मुख्य उद्देश या महासर्वेक्षणामागे होता.
मेहरूण परिसरात कचर्याचे ढिग
मेहरुण परिसरातील गणेशपुरी, अक्सा नगर,मास्टर कॉलनी आदी भागात ममता हॉस्पिटलजवळ,नवरंग मंडल वाल्याच्या घराजवळ,नागौरी चौक,माता रमाबाई आंबेडकर मराठी शाळे जवळ,लहान मिल्लत शाळेजवळील नाला,इकरा शाळेजवळ या ठिकाणी घाणीचे,कचर्याचे ढिग पडलेले आहेत. तसेच रविवारी सकाळी 6 ते 10 वाजेदरम्यान या प्रभागात महानगरपालिकेचे झाडू कामगार, गटर कामगार साफसफाई करतांना दिसून आले नसल्याचे जळगाव फर्स्टतर्फे कळविण्यात आले आहे.
यांनी केले सहकार्य
जळगाव फर्स्टतर्फे विशाल वाघ, अकिब खान, विजय पाटील, संजय राजपूत, योगेश पाटील, अनिल साळुंखे, राजेंद्र महाजन, विशाल पवार यांच्या मोबाईलवर प्रभागनिहाय अस्वच्छेतेचा फोटो व्हॉटस्अवर नोंदविण्यात आले आहेत. तसेच त्यांना राकेश पाटील, डॉ. विकास पाटील, चेतन पाटील, सभाष ठाकरे, अश्फाक पिंजारी, राहुल लष्करे, मतीन पटेल, मनोज चौधरी, सतीश वाणी, अशोक सपकाळे यां व्हॉटस्अप नंबरवर अस्वच्छतेचे फोटो मागविण्यात आले होते.
नवी पेठ, बळीरामपेठ भागातून तक्रारींचा पाऊस
शिवाजी नगर, गेंदालाल मिल, दुध फेडरेशन, कानळदा रोड,कुंभारवाडा, दाळफळ, इंद्रप्रस्थ नगर,भुरे मामलेदार प्लॉट यापरिसरातून 68 तक्रारी आल्या आहेत. तर गणेश कॉलनी, चंद्रप्रभा कॉलनी,शाहू नगर,जिल्हापेठ पो.स्टे. प्रताप नगर .नंदनवन कॉलनी,रिंगरोड,महेश प्रगती,रोड,कोर्ट रोड,भास्कर मार्केट ,विद्युत कॉलनी,शिव कॉलनी,भूषण कॉलनी,आशा बाबा नगर येथून 138 तक्रारी आल्या आहेत. तसेच भोईटे नगर,एस एम आय टी , मुक्ताईनगर,निवृत्तीनगर ,खोटे नगर, आहुजा नगर,इंद्रनील सोसायटी, ,श्रीराम नगर,श्रीरत्न कॉलनी,दादावाडी ,अष्टभुजा नगर .पिंप्राळा गाव , पिंप्राळा हुडको येथून 126 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक 265 तक्रारी नवीपेठ,बळीरामपेठ,टावर,दाणाबाजार, शनिपेठ,आसोदा रोड,वाल्मिक नगर,कांचन नगर, जुने जळगाव,ईश्वर कॉलनी, गणेशवाडी .तुकाराम् वाडी येथून आल्या आहेत. दरम्यान ह्या सर्व तक्रारी फोटोसह महासर्वेक्षणाचा अहवाल आयुक्त जीवन सोनवणे यांना लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.
तीन दिवसाआड साफसफाइ
या उपक्रमांतर्गत जळगाव फर्स्टच्या स्वयंसेवकांनी आपापल्या प्रभागात स्थळपाहणी केली. शहरातील चारही प्रभागांमध्ये सर्वत्र घाण पहावया मिळाली. या भागांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारीं केल्या आहेत. एकूणच कमी झाडू कामगार, गटारीं कामगारांकडून प्रभागांची स्वच्छता करून घेण्याचा प्रकार सुरू असल्याने दोन ते तीन दिवसाआड साफसफाई होत आहे.