जळगाव: बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला फारसा परीणाम दिसून आला नाही. शहरातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मोर्चेकरी जमल्यानंतर या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी मोर्चेकरांना परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी घरी जाणे पसंद केले.
धुळे : भारत बंद दरम्यान शिरपुरला बसवर दगडफेक, एक जण किरकोळ जखमी झाला. धुळ्यात साक्री रोडवर टायर जाळले.