सहा दिवसातील दुसरी घटना
जळगाव ः वावदडा येथे नातेवाईकाची भेट घेण्यासाठी बाहेरगावी जात असलेल्या महिलेची बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत 10 वर्षीय मुलीने मंगळसूत्र लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान 6 दिवसातील दुसरी घटना आहे.
शहरातील जैनाबाद परिसरातील हरिओमनगर मधील शारदा ज्ञानेश्वर कोळी (वय 36) या गुरुवारी सकाळी वावदडा येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. बसने त्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी जात होत्या. यादरम्यान वावदडा जाण्यासाठी बस उभी राहल्याने ते बसमध्ये चढत होत्या. यादरम्यान त्यांची 10 हजार रुपये किमतीची मंगलपोत तोडून नेली. त्याला प्रकार लक्षात आला असता मागे वळून बघितले असता अंदाजे 10 वर्षाची मुलगी पोत लांबवून पळाल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केली असता उपयोग झाला नाही. तोपर्यंत मुलगी पसार झाली आहे. यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलिसालाही घातला होता गंडा
21 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस आशा काळू पांचाळ या जळके येथे माहेरी जात होत्या. यादरम्यान नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्समधून 25 हजाराचा एैवज लांबविल्याची घटना घडली होती. या घटनेला 6 दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा मंगळसूत्र लांबविल्याची घटना समोर आली. दरम्यान पोलीस सुरक्षित नसल्याने नागरिकाच्या सुरक्षेचे काय असा संतप्त सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.