जळगाव बाजार समितीत मंत्री गुलाबराव पाटलांना धक्का, देवकरांचे वजन वाढले

महाविकास आघाडीला दहा, भाजपला सहा, दोन जागांवर अपक्ष विजयी

जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दहा जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतिचा दणदणीत पराभव केला आहे. भाजप शिंदे गटाला सात जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांनी तालुक्यातील दबदबा सिद्ध केला आहे.