जळगाव मनपातर्फे 17 दिव्यांग बांधवांना मिळाले हक्काचे घरकुल

0

जळगाव-मनपाने पिंप्राळा हुडको येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये दिव्यांग बांधवांना घरकुल मिळण्यासाठी संघटनेतर्फे अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांगांना घरकुल देण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले होते.त्यानुसार बुधवारी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते 17 दिव्यांगांना घरकुल वाटप करण्यात आले.
मनपाने नवीन बांधलेल्या घरकुलांमध्ये रिक्त असलेले विविध घरकुले हे शहरातील अंध-अपंग बांधव यांना रहिवासासाठी उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार आज देण्यात आले.यावेळी आमदार राजूमामा भोळे , उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दिलीप पोकळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, उपायुक्त अजित मुठे, शहर अभियंता सुनिल भोळे, अभियंता श्री.सोनगिरे, अंध-अपंग संघटननेचे विठ्ठल पाटील ,सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी, संजय चौधरी, मंगेश जोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.