जळगाव मनपा कडून दिलगिरी व्यक्त

0

जळगाव: तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध सेवाभावी संस्थाना खुल्या जागा वितरीत केल्या होत्या. जिल्हा बँकेची जागा देखील जागृती महिला मंडळाला देण्यात आली होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी मनपा प्रशासनाने नोटीस काढली होती. ही नोटीस चुकीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना नोटीस बजाविली होती. त्यामुळे जळगाव मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. यावर मनपा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत चुकीने पत्र दिले गेले असल्याचे पत्रकाद्वारे दिले गेलेले पत्र रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

पत्रकाद्वारे जागृती महिला मंडळ समजून शिपायाकडून पत्र दिले गेले असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच या पत्राशी आपला काही सबंध नसल्याने सुनावणीस येण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मनपाने मंगला पाटील यांना दिलेल्या पत्रात ५ डिसेंबर रोजी नगररचना विभागात सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितले होते.