जळगाव मनपा गाळेधारकांच्या समस्यांबाबत बैठक

0

मुंबई:- जळगाव तसेच महाराष्ट्रात अनेक महापालिकांमध्ये गाळे धारकांना मुदत वाढवून देण्यासंदर्भात कायद्यात तरतूद नसल्याने मोठा गुंता निर्माण झाला आहे. यासंबंधात जळगाव मनपाच्या मालकीच्या गाळेधारकांच्या समस्यांसंबंधित मंत्रालयात जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांच्यसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पाटील यांनी गाळ्यांच्या समस्यांसंदर्भात अडचणी व कायद्यातील तरतुदी याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील महापालिकांच्या संदर्भात बोलताना पाटील यांनी या प्रक्रियेत न्यायनिवाडा करताना कोणताही अडथळा न होता धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मुदत करार संपलेले गेले, त्यांचे थकीत रक्कम व गेला करार वाढवून घेण्याची इचछा असलेले गाळेधारक यांच्यावर कुठ्लऊही प्रकारे अन्याय होणार नाही असे आश्वासन पाटील यांनी दिले.

महापालिकांनी गाळे धारकांना दिलेली थकबाकीची बिले गाळेधारकांनी स्वीकारून त्वरित भरणा करावा. यात त्यांची तक्रार असल्यास तक्रार कायम ठेवून भरणा करून घेण्यासाठी पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मनपाची झालेली आर्थिक कोंडी व गाळे धारकांवर असलेली लिलावाची टांगती तलवार या विषयावर ही बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.