जळगाव महानगरपालिकेत 859 पदे रिक्त

0

रिक्त पदे भरण्याची डॉ.चंद्रशेखर पाटील यांची मागणी


जळगाव: महानगरपालिकेत 2674 पदे मंजूर असून आजतागायत 859 पदे रिक्त आहेत. तसेच जून 2020 मध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होणार आहे. परिणामी मनपाच्या कामकाजासाठी अडचणी निर्माण होईल. त्यामुळे रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी प्रभारी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

मनपात अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या तोकडी असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही. मनपात 2674 पदे मंजूर असून 859 पदे रिक्त आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजासाठी अडचणी निर्माण होत आहे. तसेच जून मध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने अधिकच ताण निर्माण होईल. त्यामुळे रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा अशी मागणी नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी प्रभारी आयुक्तांकडे केली.

अंदाजपत्रकासाठी 11 रोजी स्थायी समितीची सभा

जळगाव- महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी दि.11 रोजी दुपारी 3 वाजता स्थायी समितीची सभा सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महानगरपालिकेचे सन 2019- 2020 चे सुधारित व 2020-2021 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याकडे जळगावकरांचे लक्ष
लागले आहे.