जळगाव महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी सुनील महाजन

0

जळगाव-महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक माजी उपमहापौर सुनील महाजन यांची आज निवड करण्यात आली आहे. तसेच नगरसेवक बंटी जोशी यांची गटनेतेपदी तर उपगटनेतेपदी ईब्राहिम पटेल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. निवडीच्या घोषणेवेळी आमदार चंद्रकांत सोनावणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे, शरद सोनवणे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मागील महिन्यात जळगाव मनपासाठी निवडणूक झाली होती. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश मिळविले. भाजपला ५७ जागा मिळाल्या तर शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावे लागले. येत्या १८ सप्टेंबर रोजी महापौर पदाची निवड होणार आहे.