जळगाव महापालिका निवडणूक : साडेतीन वाजेपर्यंत 35 टक्के मतदान

0

दुपारनंतर अनेक मतदान केंद्रावर रांगा : भाजपा नगरसेवकाच्या वाहनात आढळली रोकड

जळगाव- जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले तर दुपारनंतर शहरातील अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते तर सायंकाळी उशिरापर्यंत या रांगा कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदारांचा काहीसा निरूत्साह असल्याने 55 वा 60 टक्क्यांपर्यंत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

भाजपा नगरसेवकाच्या वाहनात आढळली रोकड
भुसावळचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमोल इंगळे यांच्या चारचाकी (एम.एच.19 बी.डी.4141) या वाहनात रोकड सापडल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकाराची माहिती रामानंद पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी वाहनाचा ताबा घेतला तर इंगळे यांनी वाहनातील रोकड आपली नसल्याचे सांगत या संदर्भात सायंकाळी पोलिसांकडून माहिती घेणार असल्याचे सांगितले.