प्रभाग 18 मध्ये एमआयएमचे उमेदवार पुढे
जळगाव- महापालिका निवडणुकीत आता मतमोजणीचे कल येण्यास सुरूवात झाली आहे. प्रभाग 18 मध्ये एमआयएम उमेदवार रियाज बागवान हे 1059 मते घेऊन आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीअखेर प्रभाग 17 अ मध्ये भाजपच्या मीनाक्षी पाटील या 2011 मते घेऊन आघडीवर आहे. सुचित्रा महाजन यांना 727 मते मिळाली आहे. 17 ब मध्ये शिवसेनेच्या मिनाक्षी सरोदे या 1614 मते घेऊन आघाडीवर असून त्या पाठोपाठ भाजपच्या रंजना सोनार यांना 906 मते मिळाली आहे. 17 क मध्ये भाजपचे सुनील खडके यांना 2192 मते मिळाली असून शिवसेनेचे प्रकाश जैन यांना 565 मते मिळाली आहे. 17 ड मध्ये भाजपचे विश्वनाथ खडके 2316 तर अपक्ष हर्षल मावळे यांना 273 मते मिळाली आहे.